मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने हरयाणाच्या सोनीपत येथून एकाला ताब्यात घेतले. लवकरच त्याला मुंबईमध्ये आणून गुह्याच्या अनुषंगाने चौकशी करू असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत नवनवीन बाबी समोर येत आहेत. आरोपींना देण्यात आलेल्या पैशांसंदर्भात एकाचे नाव पुढे आले. त्यानुसार खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सोनीपत येथून एकाला ताब्यात घेतले. या गुह्यात अटकेत असलेला कुणाल यांचा तो मित्र असल्याचे समजते. पोलिस अधिक तपास करत आहेत.
















