मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहे. यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. अशात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या जाहीरातीमध्ये काम केलेले अभिनेते राज नयानी यांना पॉर्नस्टार म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आता राज नयानी यांनी आक्रमकणे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे.
तसेच चित्रा वाघ यांनी त्याची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. जर वाघ यांनी माफी मागितली नाही तर नयानींनी वाघ यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी २ मे रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये वाघ यांनी शिवसेना पक्षावर गंभीर आरोप केले होते. चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, शिवसेनेने आपल्या प्रचारासाठी केलेल्या जाहिरातीमध्ये एका पॉर्नस्टार कडून अभिनय करून घेतला आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी काही छायाचित्रेही दाखवली.