35.3 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeअंतरराष्ट्रीयकाल नियुक्ती आज खात्मा...? इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही मारले

काल नियुक्ती आज खात्मा…? इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही मारले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहेत. अनेक क्षेपणास्त्रं टाकली जात आहेत. इराणमधील प्रमुख शहरे निशाण्यावर आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांची निवड करण्यात आली. अयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा जीव गेला. इराणमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सरकारी इमारती पाडण्यात आल्या. त्यामध्येच अत्यंत मोठा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. हा दावा इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल आहे, या दाव्याने खळबळ उडाली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही हल्ल्यात ठार करण्यात आल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेने केला आहे. खरोखरच नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार केले का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेच्या या दाव्यावर इराणकडून अजून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट आपली लष्करी ताकद दाखवणारा व्हीडीओ त्यांनी शेअर केला.

इराणी लोक सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचे बघायला मिळाले. त्यामध्येच अमेरिकेच्या दाव्याने जगात खळबळ उडाली. अली रजा अराफी मारले गेल्याचा दावा एनएसएने केला. इस्रायलच्या न्यूक्लिअर प्लँटवर इराणकडून मोठा धमाका करण्यात आला. या युद्धाच्या झळा अनेक खाडी देशांना बसताना दिसत आहेत. फ्रेंचची युद्ध नौका इराणच्या दिशेने निघाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दावा करत म्हटले की, नवे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार करण्यात आले. या हल्ल्यात इस्रायलचे १०० सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. हेच नाही तर इराणने अमेरिकेचे जेटही पाडले, ज्याचा व्हीडीओ सध्या व्हायरल होत आहे. इस्रायलवर अधिक भीषण हल्ला करणार असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणवर अमेरिका मोठे हल्ले करत आहे. या युद्धाचा थेट फटका दुबईला बसल्याचे दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR