23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeराष्ट्रीयआर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनीत गोंधळ

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनीत गोंधळ

सुरतमध्ये वेतनवाढीसाठी संपावर उतरलेल्या कर्मचा-यांनी केली जाळपोळ, महिला डीसीपी जखमी

सुरत : गुजरातच्या सुरतमधील हजीरा येथील आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनीत गुरुवारी सकाळी गोंधळ झाला. पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर उतरलेले कर्मचारी अचानक संतप्त झाले. त्यांनी १० हून अधिक गाड्यांना आग लावली. इतकंच नाही, तर आंदोलकांनी पोलिस पथकावरही हल्ला केला, ज्यात महिला डीसीपी जखमी झाल्या.

कंपनीच्या नवीन प्लांटमध्ये आज सकाळी ५००० हून अधिक कर्मचा-यांनी अचानक काम सोडून संप पुकारला. संपाचे मुख्य कारण म्हणजे कामाच्या तासांमध्ये झालेली वाढ कमी करणे आणि पगारवाढ. सुरुवातीला संप शांततेत सुरू होता. पण अचानक काही कर्मचा-यांनी हिंसक आंदोलन सुरू केले. कंपनीच्या तीन अग्निशमन दलाच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवण्यात आले. इतकंच नाही, तर संतप्त जमावाने चार सायकलींना आग लावली. बातमी मिळताच मोठ्या संख्येने पोलिस दल, क्राईम ब्रांच आणि एसओजीची पथके प्लांटवर पोहोचली आणि उपद्रवींना शांत केले. सध्या प्लांटमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. याबाबत लार्सन अँड टुब्रोने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, गुजरात सरकारद्वारे कामगार संहितेची अधिसूचना लागू होताच, आम्ही त्यातील सर्व नियमांची तात्काळ अंमलबजावणी करू. सध्या आम्ही सर्व कर्मचा-यांना शांतता राखण्याचे आवाहन करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR