सोलापूर : दरवर्षी थंडीच्या काळात अन्नशोधार्थ हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून येणारे पट्टकादंब हंस पक्षी हिप्परगा तलावावर आले आहेत. आज पक्षीनिरिक्षण करताना पट्टकादंबा सोबतच रंगीत करकोचा, चक्रवाक, हळदी-कुंकू, राखी बगळा, काळ्या डोक्याचा कुदळ्या, लाल डोक्याचा कुदळ्या, ब्राम्हणी घार, नदी सुरय, खाटीक, खंड्या, जांभळा बगळा, मोठा बगळा, शेकाट्या, वेडा राघू, कोतवाल, लाल गाठीची टिटवी, माळ टिटवी, पाण कावळा इ. पक्षी हिप्परगा तलाव परिसरात आढळले.
महावितरण अक्कलकोट येथे नोकरीस असलेले ओंकारनाथ गाये हे नोकरी करत पक्षी निरिक्षणाचा छंद जोपासतात. आज पक्षी निरिक्षणास हिप्परगा येथे गेले असता हजारो किमी दूरून आलेल्या पट्टकादंबाच्या थव्याचे दर्शन झाले.