17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

बुलडाण्यात खळबळ, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. तालखेड गाव आणि तालखेड फाट्याच्या मधे हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधूले होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सुनील कोल्हे यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भर्ती करण्यात आले आहे. बुलडाणा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार अ‍ॅड. जयश्री शेळके रुग्णालयात दाखल झाल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी केली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राण घातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचे जयश्री शेळके यांनी आरोप केले आहेत.

जिल्हा पोलिस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान कोल्हे यांना भेटण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्ण्यालयाकडे धाव घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR