नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच हरयाणा विधानसभा निवडणूक शुक्रवारी जाहीर केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात ही पहिलीच निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर ६ ऑक्टोबरला निकाल असणार आहे.