मुंबई : महायुतीच्या अमरावतीच्या लोकसभानिहाय बैठकीला आपण मुद्दामहून जाणार नाही. सध्या आमची भूमिका तटस्थ आहे. आम्ही वाट पाहतोय. भाजपाला जेवढी लोकसभा महत्त्वाची आहे. तेवढीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. आमची भूमिका काय आहे? हे वेळ आल्यावरच सांगू असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
आमचा मतदारसंघ सोडून दोन नगर पंचायती प्रहारच्या आहेत तेथेही आम्हाला निधी मिळालेला नाही असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. विधान परिषदेबाबत भाजपा काय निर्णय घेणार आहे. त्यांनी समोरासमोर बसून निर्णय घ्यावा त्यानंतर मग आम्ही तयारीला लागू असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. विधानसभेबाबत भाजपाचे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही तटस्थ राहू, वाट पाहू अन्यथा आम्ही गेम करू, असेही आमदार बच्चू कडू यांनी भाजपाला आव्हान दिले आहे.