24.3 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeराष्ट्रीयफोन हॅक करण्याचा प्रयत्न; विरोधकांचा मोठा दावा

फोन हॅक करण्याचा प्रयत्न; विरोधकांचा मोठा दावा

नवी दिल्ली : काँग्रेसचे शशी थरूर, शिवसेनेच्या (यूबीटी) प्रियांका चतुर्वेदी आणि एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी दावा केला आहे की, त्यांचे फोन हॅक केले जात आहेत. या नेत्यांनी दावा केला आहे की, अ‍ॅपल कंपनीनेच हॅकिंगच्या प्रयत्नाची माहिती त्यांच्यासोबत मेसेज पाठवून शेअर केली आहे.

तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांनाही आयफोन सुरक्षा धोक्याचा इशारा मिळाला आहे. त्यांनी दावा केला की, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि काँग्रेसचे पवन खेडा यांनाही हॅकिंगच्या प्रयत्नांबाबत इशारा देण्यात आला होता. त्याचवेळी शिवसेनेच्या (यूबीटी) प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या फोनवर आलेला संदेश सोशल मीडियावर शेअर केला.

काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अ‍ॅपलची नोटीस संपूर्ण विरोधकांच्या विरोधात आली आहे. माझ्या कार्यालयातील प्रत्येकाला ही नोटीस मिळाली आहे. काँग्रेस पक्षात एक यादी तयार करण्यात आली आहे. हे सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे या प्रकरणात सहभागी आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयातील तीन जणांनाही असेच संदेश आले आहेत.

दरम्यान, अ‍ॅपलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही विशिष्ट प्रायोजित हॅकरबद्दल बोलू शकत नाही. हे शक्य आहे की, अ‍ॅपलची काही माहिती खोटी चेतावणी असू शकते. अ‍ॅपलच्या मते, जेव्हा त्याच्या सिस्टमला “राज्य-प्रायोजित हल्ल्याशी सुसंगत क्रियाकलाप” आढळतो तेव्हा या सुरक्षा धोक्याच्या सूचना ट्रिगर केल्या जातात. कदाचित “अल्गोरिदम खराबी” मुळे ट्रिगर झाल्या आहेत आणि त्रुटीबद्दल तपशीलवार माहिती लवकरच दिली जाईल.

कारण सांगण्यास अक्षम
ऍपलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ऍपल अशी कोणतीही अधिसूचना जारी करत नाही. आम्ही कोणत्याही विशिष्ट राज्य-प्रायोजित हॅकरबद्दल बोलू शकत नाही. ऍपलच्या काही सूचना खोट्या चेतावणी असू शकतात. आम्ही कारण सांगण्यास अक्षम आहोत. कारण सांगितल्याने हॅकर्सना भविष्यात ते टाळण्यास मदत होऊ शकते.

देशाची संपत्ती हिरावून घेतात
राहुल गांधी म्हणाले की, ते कधी इकडे लक्ष वेधून घेतात, कधी तिकडे लक्ष वेधून घेतात. मनात राग निर्माण करतात आणि जेव्हा तुमच्या आत द्वेष निर्माण होतो, तेव्हा हे लोक या देशाची संपत्ती हिरावून घेतात. या पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अनेक विधाने केली. यावेळी त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या फोन निर्मात्याकडून मिळालेल्या चेतावणी ई-मेलची प्रत दाखवण्यात आली. ”राज्य प्रायोजित हल्लेखोर” (स्टेट स्पॉन्सर्ड अटैकर्स) त्यांच्या फोनशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे या कंचेतावणीत म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR