33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home औरंगाबाद अँटिजन टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी 87 विक्रेत्यासह 252 पॉझिटिव्ह

अँटिजन टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी 87 विक्रेत्यासह 252 पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

औरंगाबादेत चिंता आणखी वाढली : 85 व्यापारी पॉझिटिव्ह निघाले : शहरात जागोजागी अँटिजन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मोहिम; तपासणीचे चांगले परिणाम आले समोर

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या वतीने शहरात जम्बो कोरोना टेस्ट मोहिम राबवण्यात आली. दिवसभरात तब्बल 9 हजार 903 लोकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 252 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे यात 85 व्यापारी पॉझिटिव्ह निघाले आहे. यात औरंगपुरा येथील केंद्रावर सर्वाधिक 25 विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे अँटिजन टेस्ट केल्या नसत्या तर या व्यापारींपासून संसर्गाची साखळी वाढू शकली असती, असं मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितलं.

शहरात जागोजागी अँटिजन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मोहिम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी महापालिकेने शहरात 10 जुलैपासून 18 जुलैपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केले होते. त्याचा आज शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी महापालिकेच्या यंत्रणेने शहरात जागोजागी अँटिजन पद्धतीच्या कोरोना टेस्टची मोहिम राबवली. शहरातील भाजीपाला, किराणा, चिकन, मटण, अंडी, दूध या विक्रेत्यांना रविवारपासून दुकाने उघडण्यासाठी कोरोना तपासणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे या तपासण्यासाठी शहरात 22 ठिकाणी शिबीर घेण्यात आले. त्यात दिवसभरात 4418 विक्रेत्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यातील 87 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नाथ सुपर मार्केटमधील शिबिरात सर्वाधिक 25 विक्रेते पॉझिटिव्ह

या सर्वांना तातडीने कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. एकूण पॉझिटिव्ह निघालेल्या विक्रेत्यांमध्ये औरंगपुरा येथील नाथ सुपर मार्केटमधील शिबिरात सर्वाधिक 25 विक्रेते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ रामनगर येथे 14 आणि संभाजी कॉलनी येथे 14 विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच महापालिकेने शहरातील 6 चेक पॉईंट आणि इतर काही वसाहतींमध्ये सामान्य नागरिकांसाठीही तपासणी मोहिम राबवली. त्यात पाच हजार 629 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 167 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांनाही मनपाच्या कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले.

कुटुंबातील 14 व्यक्तीच्या अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह

विशेष म्हणजे यातील एक व्यापारी जो अँटिजन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह निघाला त्याच्या घरच्या लोकांच्याही अँटीजन टेस्ट घेतल्या गेल्या. त्याच्या कुटुंबातील 14 व्यक्तीच्या अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी एबीपी माझाला दिली. यापुढे देखील शहरात 25 जुलैपर्यंत जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट केल्या जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात इतर व्यापारी वर्गाच्या अँटिजन टेस्ट करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त यांनी दिली आहे.

Read More  जालन्यात चिंता वाढली 118 नव्या रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या