औरंगाबाद : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दरम्यान मराठवाडा (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण १५ उमेदवारांचे ३० नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी दिली. तर शुक्रवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होणार आहे.
राज्यातील पाच जागांसाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणुका पार पडतायात. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजचा शेवटचा दिवस होता. दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १५ उमेदवारांचे ३० नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. तर नामनिर्देशन अर्ज दाखल करणा-यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे किरण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विक्रीम काळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर उर्वरित उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखले केले आहेत. तसेच उद्या १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्जाची छाननी होणार आहे.