19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeऔरंगाबादमराठवाडयात रब्बीची ३४ टक्के पेरणी पूर्ण

मराठवाडयात रब्बीची ३४ टक्के पेरणी पूर्ण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : खरिपाच्यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसत, रब्बीच्या कामाला लागले असल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. तर मराठवाड्यात आतापर्यंत ३४ टक्के रब्बीची पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ७ लाख ४१ हजार १८०.२८ हेक्टर असून, त्यापैकी आतापर्यंत २ लाख ३० हजार २८४ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

औरंगाबाद कृषी सहसंचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्याचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ९० हजार ९३५ हेक्टर असून, त्यापैकी २० हजार ४९६ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. जालना जिल्ह्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर असून त्यापैकी ६३ हजार १७७ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यात एक लाख ४६ हजार ६११ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या असून, सर्वसाधारण लागवड क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण ४४.११ टक्के एवढे आहे.
औरंगाबाद विभागात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख दोन हजार १३८ हेक्टर असून त्यापैकी १ लाख २५ हजार ३३८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

पिकांची आकडेवारी
औरंगाबाद विभागात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर एवढे आहे. तर आतापर्यंत ८६ हजार ८६१ हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहे. तसेच विभागात गव्हाचा पेरा १८ हजार ४७१ हेक्टर झाला असून, हरभ-याचा पेरा ३ लाख ६३ हजार ९४८ हेक्टरवर झाला आहे.

शेतक-यांना रब्बीतून मोठी अपेक्षा
यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असतानाच, परतीच्या पावसाने देखील खरीप पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हातात खरीपातून काहीच आले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शेतक-यांनी लावलेला खर्च देखील निघाले नाही. काही ठिकाणी तर शेतातील पीके अक्षरश: वाहून गेली आहेत. दरम्यान आता रब्बीच्या पेरण्या सुरु झाल्या असून, यातून तरी काहीतरी हातात येईल अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. त्यामुळे अनेक भागात पेरण्या सुरु झाल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या