29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले

औरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादेत आज कोरोनाचे 395 रुग्ण आढळले. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 439 झाली आहे. आजपर्यंत 15 हजार 363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण 629 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4 हजार 447 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सकाळनंतर 249 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 43, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 51 आणि ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यात आज सात कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये घाटी रुग्णालयात गारखेडा येथील 45 वर्षीय पुरुष, माहेतपुर, औरंगाबाद येथील 40 वर्षीय पुरुष, यशवंतनगर, पैठण येथील 50 वर्षीय पुरुष, जिकठाण, गंगापूर येथील 29 वर्षीय महिला, एसटी कॉलनी सिडको येथील 70 वर्षीय पुरुष, अंधानेर, कन्नड येथील 70 वर्षीय पुरुष आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात पद्मपुऱ्यातील 63 वर्षीय महिला कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या