औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून घडना समोर आली आहे. नाईट ड्युटीवर असताना मित्राच्या पत्नीची छेड काढल्याच्या आरोपानंतर औरंगाबाद शहर पोलीस दलातील ‘एसीपी’वर शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिका-याचे नाव आहे.
नाईट ड्युटीवर असतांना ढुमे यांनी रात्री २ वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा आरोप करÞण्यात आला आहे. विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना ओळखीचा एक मित्र भेटला. तो मित्र त्याच्या बायकोसोबत तिथे आला होता. हॉटेलमधून निघताना ढुमेंनी, माझ्याकडे गाडी नाही, मला लिफ्ट द्या, अशी विनंती मित्राला केली
. त्यानंतर गाडीत बसताच ढुमे यांनी समोर बसलेल्या मित्राच्या पत्नीच्या पाठिवरून हात फिरवत विनयभंग करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.
ढुमे ऐवढ्यावरच न थांबता, पुढे आल्यावर त्यांनी मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला अशी मागणी केली. घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, असं म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. त्यावेळी त्याने तिथे देखील महिलेची छेड काढली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली, असा आरोप करण्यात आले आहे.