24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeऔरंगाबाददारूच्या गुन्ह्यात आरोपी स्थानबद्ध; राज्यातील पहिली 'एमपीडीए' कारवाई

दारूच्या गुन्ह्यात आरोपी स्थानबद्ध; राज्यातील पहिली ‘एमपीडीए’ कारवाई

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : दारूच्या गुन्ह्यात एका कुख्यात आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीएसारख्या कारवाईचा बडगा उगारत कारागृहात स्थानबद्ध केले आहे. राज्यभरातील उत्पादन शुल्कची ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती शुल्क विभागाने दिली आहे. कृष्णा सीताराम पोटदुखे (वय ३८ वर्षे, रा. बाळापुर गावठाण, औरंगाबाद) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या कुख्यात आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे सातारा हद्दीतील कृष्णा पोटदुखे याच्यावर दारू विक्री आणि तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच परराज्यातील दारूची तस्करी करण्यात तो सराईत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली दादरा नगर हवेली व दिव-दमन या केंद्रशासीत प्रदेशातील विदेशी दारू उपलब्ध करून तो बेकायदेशीर हातभट्टीच्या व्यवसायात गुंतलेले होता.

पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव
मानवी आरोग्यास घातक असलेल्या बनावट विदेशी दारु रसायन मिसळून तयार करण्यास त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे त्याच्यावर अनकेदा कारवाया करूनही कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी कृष्णा पोटदुखेवर ‘एमपीडीए’ कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्याकडे सादर केला होता. अखेर आयुक्तांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या