27 C
Latur
Friday, February 26, 2021
Home औरंगाबाद पुनश्च लॉकडाऊन

पुनश्च लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

औरंगाबादमध्ये संचारबंदी, नांदेडमध्ये १२ पासून, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये १३ पासून, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मुदतवाढ

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ज्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढत आहे. त्या शहरांत आता पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात शुक्रवारपासून संचारबंदी सुरू झाली. आज पहिल्याच दिवशी औरंगाबाद शहर कडकडीत बंद पाळण्यात आला.

ही संचारबंदी १८ पर्यंत कायम राहणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातही १२ ते २० जुलैदरम्यान, पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये १३ जुलैपासून १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. तसेच ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांची वाटचाल पुनश्च लॉकडाऊनकडे चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.

औरंगाबाद शहरात शुक्रवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून, १८ जुलैपर्यंत ही संचारबंदी कायम राहणार आहे. आज सकाळपासूनच शहरात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. चौका-चौकात पोलिसांचे तपासणी पथक आणि बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी पोलिस प्रशासनाने दिलेल्या पासची तपासणीसुद्धा चौकाचौकात केली. त्यामुळे दिवसभर शहरात कडकडीत बंद पाहायला मिळाला. दिवसभर प्रत्येक चौकाला छावण्याचे स्वरूप आले. तसेच शहराबाहेरील दौलताबाद, झाल्टा, केंब्रिज, सावंगी चेकपोस्टवरून शहरात येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला.

पेट्रोलपंप बंद, बाजार समितीत शुकशुकाट
शहरातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले. केवळ कंपनीच्या पंपांना ठराविक कालावधीपर्यंत मुदत होती. पेट्रोलपंप बंद असल्याने अत्यावश्यक सेवा बजावणाºयांची गैरसोय झाली. तसेच जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी शुकशुकाट होता.

नांदेडमध्येही लॉकडाऊन
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नांदेड जिल्हा प्रशासनानेही जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. दि. १२ ते २० जुलै या काळात जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. याबाबत नांदेडच्या जिल्हाधिकाºयांनी आदेश काढले आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन सुरू करीत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जाहीर केले. लॉकडाऊन काळात नांदेडमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांनाच सूट असेल. सरकारी कार्यालये, वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना सूट देण्यात आली आहे, तर आठवडी बाजार बंद असून विक्रेत्यांना सकाळी ९ ते २ वाजेपर्यंतच सोसायटीत जाऊन फळे, भाजीपाला विकता येणार आहे. तसेच जिल्ह्याबाहेरून फक्त अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करता येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊन, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत मुदतवाढ
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार १३ जुलैपासून १५ दिवस पुणे बंद राहणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने ठाण्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय कल्याण-डोंबिवलीतही १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

Read More  नवीन डीएसआरप्रमाणे एसटीपी प्रकल्पाचा आराखडा तयार करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या