25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home औरंगाबाद अजिंठा-वेरूळ लेणी पर्यटकांसाठी सज्ज; ऑनलाईन नोंदणी आवश्यक

अजिंठा-वेरूळ लेणी पर्यटकांसाठी सज्ज; ऑनलाईन नोंदणी आवश्यक

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील पर्यटनस्थळंही बंद करण्यात आली होती. आता पर्यटनस्थळंही सुरू करण्यास परवागी देण्यात आली आहे. अशातच तब्बल ८ महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहेत. जागतिक वैभव लाभलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्याही पर्यटकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत.

अजिंठा-वेरूळच्या लेण्या तब्बल ८ महिन्यांनंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. गुरुवारपासून लेण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश देण्यात आला आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसह इतर सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजीही पर्यटकांना घ्यावी लागणार आहे. बुधवारी अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर लेण्यांच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली होती.

अजिंठा-वेरूळ लेण्या पाहण्यासाठी मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दर दिवशी केवळ २ हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी पर्यटकांना केवळ ऑनलाईन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करावी लागणार आहे. पर्यटक पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करू शकतील.

तसेच पर्यटनस्थळी टुरिस्ट गाईड यांच्याद्वारे पर्यटकांना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेणे महत्त्वाचे असून यादृष्टीने पर्यटनस्थळे सुरळीतपणे सुरू ठेवण्यात प्रशासनासह टुरिस्ट गाईडची जबाबदारी व भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी.

आधारकार्डाव्दारे नेपाळींची घुसखोरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या