22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत आज 59 रुग्णांची वाढ

औरंगाबादेत आज 59 रुग्णांची वाढ

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1828 झाली आहे. यापैकी 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 93 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 609 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भारतमाता नगर (1), इंदिरानगर न्यू बायजीपुरा (1), न्यू कॉलनी, रोशन गेट (1), भावसिंगपुरा (1)‍, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी (1), बेगमपुरा (1), चिश्तिया कॉलनी (1), फाझलपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), गांधी नगर (1), युनूस कॉलनी (2), जुना मोंढा, भवानी नगर (1), शुभश्री कॉलनी, एन सहा (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन 9 (1), आयोध्या नगर, एन सात (7), बुडीलेन (3), मयूर नगर, एन अकरा (1),विजय नगर, गारखेडा (3), सईदा कॉलनी (1), गणेश कॉलनी (1), एसटी कॉलनी, फाजलपुरा (1), रोशन गेट परिसर (1), भवानी नगर, जुना मोंढा (1), औरंगपुरा (2), एन आठ सिडको (1), समता नगर (4), ‍मिल कॉर्नर (2), जवाहर कॉलनी (3), मोगलपुरा (2), जुना मोंढा (1), नॅशनल कॉलनी (1), राम मंदिर, बारी कॉलनी (1), विद्यानिकेतन कॉलनी (1), देवडी बाजार (1), एन सात सिडको (1), एन बारा (1), आझाद चौक (1), टी.व्ही. सेंटर एन अकरा (1), कैलास नगर (1), अनय्‍ (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

घाटी रूग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय गरोदर कोरोनाबाधित महिलेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 72, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 93 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Read More  शाळा बंद ठेवा, पालकांचे ऑनलाईन अभियान सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या