22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद शहरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण

औरंगाबाद शहरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण

एकमत ऑनलाईन

९०० बाधित, २४ तासात ४ जणांचा मृत्यू

औरंगाबाद: देशासह महाराष्ट्रात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रनंतर कोरोनाने आता मराठवाड्यात घुसखोरी केली आहे. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे शहरातील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी दुपारी शहरात २८ करोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. शहरातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ९०० झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता सर्व बंद
उद्या १७ मे रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील
यामध्ये कैलास नगर (१), चाऊस कॉलनी (२), मकसूद कॉलनी (२), हुसेन कॉलनी (४), जाधववाडी (१), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.३ (१), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१), कटकट गेट (१), बायजीपुरा (१०), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (२), लेबर कॉलनी (१), जटवाडा (१), राहुल नगर (१) आणि जलाल कॉलनी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे.

३० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
दरम्यान आज सकाळी ३० कोरोनाबधीत रूग्णांनी वाढ झाली होती. यामध्येएमजीएम मेडिकल कॉलेज (३), हनुमान चौक, चिकलठाणा (१), राम नगर (३), एमआयडीसी (१), जालान नगर (१), संजय नगर, लेन नं.६ (३), सादात नगर (४), किराडपुरा (१), बजाज नगर (१), जिनसी रामनासपुरा (१), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (१), जहागीरदार कॉलनी (१), आदर्श कॉलनी (१), रोशन गेट (१) अन्य (७) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १७ पुरुष आणि १३ महिला रुग्णांचा समावेश आहे.

२४ तासांत चौघांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमाननगर येथील ७४ वर्षीय, बायजीपुरा येथील ७० वर्षीय, शहानूर मियाँ येथील ५७ वर्षीय आणि हिमायतनगर येथील ४० वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या