27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeऔरंगाबादअर्जुन श्रीकृष्णाचेच ऐकणार

अर्जुन श्रीकृष्णाचेच ऐकणार

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीत भेट घेतली होती. यामुळे खोतकर आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत का? अशी चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडले आहे.

रावसाहेब दानवे विचित्र, धोकेबाज माणूस असल्याची टीका खैरेंनी केली आहे. एवढेच नाही तर अर्जुन श्रीकृष्णाचंच म्हणजे उद्धव ठाकरेंचंच ऐकतील, असा विश्वासही खैरेंनी व्यक्त केला आहे.

रावसाहेब दानवे विचित्र, धोकेबाज माणूस आहे. शिवसेना-भाजपाची युती असतानाही त्यांनी मला धोका दिला. एवढेच नाही तर दानवेंनी आपल्या स्वत:च्या मुलीचा संसार मोडल्याचा धक्कादायक आरोपही खैरेंनी केला आहे. जालना जिल्ह्यातील अनेक लोकांचा दानवेंवर विश्वास नाही. ते क्षणाक्षणाला आपलं वक्तव्य बदलतात. भाजपाकडून शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच फटका खोतकरांना बसला असल्याचे खैरे म्हणाले.

अर्जुन खोतकर कडवट शिवसैनिक

अर्जुन खोतकरांनी त्यांच्या ईडीच्या कामासाठी दिल्लीला गेल्याची कल्पना मला दिली होती. अर्जुन खोतकर हे कडवट शिवसैनिक आहेत त्यामुळे ते कुठेही जाणार नाहीत. त्यांचं नाव अर्जुन असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना श्रीकृष्णासारखे आहेत. त्यामुळे खोतकर उद्धव ठाकरेंचंच ऐकतील असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला आहे. अर्जुन खोतकर एकच व्यक्ती आहे जी रावसाहेब दानवेंना सरळ करू शकते, असा टोलाही खैरेंनी दानवेंना लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या