33.9 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद : घाटीत 14 तासांत 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; बळींची संख्या 31...

औरंगाबाद : घाटीत 14 तासांत 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; बळींची संख्या 31 वर

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद: औरंगाबादमधील शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत 14 तासांमध्ये 2 महिला आणि 3 पुरूष अशा 5 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत शहरात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

Read More  उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा

कोरोनाबाधित असलेल्या शंभुनगर येथील 35 वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. गल्ली न 29 येथील 35 वर्षीय महिला 13 रोजी घाटीत दाखल झाली. त्याच दिवशी तिचा स्वॅब पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान रविवारी सकाळी 6 वाजता तिचा मृत्यू झाला. तिचा रेस्पिरेटरी डिसट्रेस सिंड्रोम इन केस ऑफ कोव्हीड विथ रेट्रोव्हायरल या आजाराने मृत्यू झाला. तसेच संजय नगरातील 52 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शनिवारी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झाला. या महिलेस उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर जलाल कॉलनी येथील 32 वर्षीय पुरूष रुग्णाचा शनिवारी रात्री 9 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही कळविण्यात आले आहे. तसेच रऊफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचाही रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण 15 मे रोजी घाटीत भरती झाला होता. शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांच्यावर घाटीच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू होते. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा रविवारी सकाळी 9.15 वाजता मृत्यू झाला. त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आजारही होता असे सूत्रांनी सांगितले आहे.

रोशनगेट येथील गल्ली नं. 5 मधील 42 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचही रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाला 15 मे रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रविवारी पहाटे 1.15 वाजता उपचारादरम्यान त्याचा बायलॅटरल न्युमोनिया, विथ एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ड्यू टू कोविड-19 इन अ नोन केस ऑफ डायबेटिस मेलीटस या आजाराने मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,445FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या