24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद : उद्योग मंत्र्यांच्या गाडीसमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : उद्योग मंत्र्यांच्या गाडीसमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद 12 जून: शेंद्रा MIDCमध्ये सुरू असलेल्या थर्मोकॉल कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. हा आरोप गेली अनेक महिन्यांपासून होतोय. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. या त्रासामुळे त्रस्त झालेल्या महिलेने उद्योग आणि पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या गाडीसमोर येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात आज चांगलीच खळबळ माजली.

राज्याचे उद्योग आणि राज्याचे पालकमंत्री असलेले सुभाष देसाई हे आज औरंगाबदमध्ये होते. जिल्हाधिकार्यालयात बैठक आटोपून ते निघत असतानाच एक महिला अचानक त्यांच्या गाडीपुढे येत रस्त्यावरच झोपली.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला. आम्रपाली हिवाळे असे या महिलेचे नाव आहे. शेंद्रा डीएमआयसी मध्ये असलेल्या एका थर्मोकॉल कंपनीमुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करीत आम्रपाली हिवाळे ही महिला थेट पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या गाडी समोर जाऊन झोपली.अचानक घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी सदर महिलेचा ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. तर या प्रकरणात लक्ष घालून तपास करण्याचे आदेश सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

Read More  लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीचा जीव घेऊन तरुणाचा गळफास

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या