औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता 35 वर पोहोचली आहे.
बहिमायतबाग, हिमायतनगर येथील 65 वर्षीय रुग्णाला 17 मे रोजी घाटी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. त्याचवेळी त्याच स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. तो 18 रोजी सकाळी पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले. या रुग्णावर यापूर्वी बायपासची शस्त्रक्रिया झालेली होती. तसेच त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे आजारही होते. त्यामुळे त्याच्याकडून उपचारास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीच्या सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रात लॉकडाउन 4 ची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, तरीही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. आज कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृतांची संख्या 35 वर पोहोचली आहे.
शहरात मागील 30 दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलली असल्याचं समोर आलं आहे. 18 मे रोजी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1000 पेक्षा जास्त झाली आज शहरातील हिमायतनगर, हिमायतबाग येथील 65 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाला ताप आणि दमा होता. त्यामुळे या रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली.
सोमवारी 18 मे रोजी या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. परंतु, काल उपचारादरम्यान या रुग्णाची प्रकृती खालावली. त्याला तातडीने व्हेंडिलेटवर ठेवण्यात होतं. परंतु, रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात कोरोनामुळे मृतांचा आकडा आता 35 वर पोहोचला आहे.
आज 51 रुग्णांची वाढ
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 वर पोहोचली आहे. आज सकाळी शहरातील रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1), सादात नगर, गल्ली नं. 6 (4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (4), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (1), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर(1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1) अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे.