27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeऔरंगाबादऔरंगाबाद  : कोरोनाचा भयंकर उद्रेक! केंद्रीय पथक घेणार आज आढावा

औरंगाबाद  : कोरोनाचा भयंकर उद्रेक! केंद्रीय पथक घेणार आज आढावा

एकमत ऑनलाईन

घराघरात जाऊन सर्वेक्षण करा, केंद्रीय आरोग्य सचिव यांचे निर्देश : नव्या ७२ रुग्णांची वाढ; बाधितांचा आकडा २ हजार पार

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरातील कोरोनाचा उद्रेक खडक उपाययोजना करूनही थांबत नसल्यामुळे दररोज रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. त्यातही बाधित रुग्णांमध्ये वृद्धांची संख्या जास्त असून जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपायांचा केंद्रीय पथक आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेणार असून गरज पडल्यास प्रत्येक शहरात येऊन पाहणी करणार आहे.

औरंगाबाद शहरात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येने आता दोन हजारांचा आकडा पार केला आहे. कडक लॉकडाऊन, योग्य कंटेनमेंट तसेच आरोग्य सुविधा, संपर्काचा शोध आणि मुख्य म्हणजे सर्वाधिक चाचण्या होऊनही कोरोनाचा उद्रेक थांबायला तयार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी देशभरातील कोरोनाचा भयंकर उद्रेक असलेल्या 38 जिल्ह्यांच्या प्रशासनाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यासह घाटी रुग्णालयाचे अधिकारी या व्ही.सीमध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत झालेल्या चर्चेची माहिती देताना आस्तिक कुमार पांडेय म्हणाले की कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात करण्यात आलेल्या उपायांची माहिती त्यांना देण्यात आली. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या सर्व कामांचा आढावा त्यांनी घेतला. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकही व्हीसीच्या माध्यमातून मंगळवारी आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More  राखेतून कोळसा तयार करण्यात यश : संशोधनासाठी सरकारकडून पेटंट

कुणाल कुमार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून सहसचिव यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रासाठी कुणाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून केंद्रीय पथकाच्या व्हीसीनंतर ते जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

घराघरात जाऊन सर्वेक्षण करा, केंद्रीय आरोग्य सचिव यांचे निर्देश
देशातील 38 जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक तीव्र आहे. या जिल्ह्यात घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्यात यावे, संक्रमण रोखण्यासाठी संशयितांवर निगराणी ठेवण्यात यावी जेणेकरून मृत्यूदर कमी होईल अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी केली. आगामी काळातील परिस्थिती समोर ठेवून जिल्हा प्रशासनाला आराखडा तयार करावा असेही त्या म्हणाल्या .

याठिकाणी आढळले रुग्ण : आज, मंगळवारी आढळलेल्या रुग्णांत वडगाव कोल्हाटी १, बजाजनगर, मोरे चौक ३, पंढरपूर परिसर १, बारी कॉलनी २, रोशन गेट ३, कोहिनूर कॉलनी, पानचक्की जवळ १, नागसेन नगर, उस्मानपुरा १, भवानी नगर, जुना मोंढा १, मिल कॉर्नर १, संजय नगर, मुकुंदवाडी २, असेफिया कॉलनी १, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी १, जाधववाडी १, पेठे नगर, निसर्ग कॉलनी १, नारेगाव १, एन-११, मयूर नगर, हडको १, बिस्म‍िला कॉलनी १, रेहमानिया कॉलनी २, एन-आठ सिडको १, हर्सुल परिसर २, सिल्लेखाना, क्रांती चौक १, बंजारा कॉलनी २, कटकट गेट, शरीफ कॉलनी १, एसटी कॉलनी, कटकट गेट २, संजय नगर, बायजीपुरा १, गणेश कॉलनी, मोहनलाल नगर ४, वसंत नगर, जवाहर कॉलनी १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी २, समता नगर २, पडेगाव १, रोहिणी नगर १, न्याय नगर १, गादिया ‍विहार २, शिवाजी नगर १, गारखेडा परिसर ३, अशोक नगर,एमआयडीसी, मसनतपूर २, व्हीआयपी रोड, काळीवाडा १, सिटी चौक २, युनुस कॉलनी १, नूतन कॉलनी १, रवींद्र नगर १, दशमेश नगर १, अरिहंत नगर १, विद्या नगर १, एन चार , गुरू साहनी नगर १, अंबिका नगर १, पोलीस कॉलनी, मुकुंदवाडी १, एन सहा, सिडको १ कैलास नगर १, रोकडा हनुमान कॉलनी १, जटवाडा रोड परिसर १, अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २६ महिला आणि ४६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या