17.4 C
Latur
Monday, January 25, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद: ताप आल्यास ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक

औरंगाबाद: ताप आल्यास ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक

एकमत ऑनलाईन

महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली माहिती

औरंगाबाद: कोणताही ताप असो, कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. शहरातील सर्व डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणा-या तापाच्या रुग्णांना कोरोना चाचणी करून घेण्यास सांगण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

सध्या शहरात तापेचे रुग्ण वाढले आहेत. ताप आल्यावर अनेकजण घरगुती उपचार करतात किंवा नेहमीच्या डॉक्टरकडे जातात. डॉक्टरांनी दिलेली औषधी घेण्यात त्यांचे चार-पाच दिवस निघून जातात. संबंधिताला ‘कोरोना’ विषाणू संसर्ग झाला असल्यास चार-पाच दिवस वाया जातात. ताप आलेल्या व्यक्तीने लगेच चाचणी केल्यावर, तो ‘पॉझिटिव्ह’ निघाल्यास त्याला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून आवश्यक उपचार केले जाऊ शकतात. विषाणू संसर्गानंतर पहिले चार ते पाच दिवसच उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. त्यामुळे व्यक्तींना आता कोणताही ताप असो, कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. याबद्दल एक परिपत्रक काढून शहरातील डॉक्टरांना माहिती दिली जाईल, असे डॉ. पाडळकर म्हणाल्या.

सिरो सर्वेक्षणाचे अहवाल आरोग्य केंद्रांमध्ये
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात सिरो सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी चार हजार ५५० जणांच्या रक्तनमुन्यांचे संकलन करण्यात आले होते. या नागरिकांचे तपासणी अहवाल संबंधित आरोग्य केंद्रांना पाठवण्यात आले आहेत. नागरिकांनी अहवाल घेण्यासाठी संबंधित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.

कळंबा कारागृहातील ८२ कैद्यांना कोरोनाची लागण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या