29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home औरंगाबाद औरंगाबाद संचारबंदी : पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यांवर

औरंगाबाद संचारबंदी : पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यांवर

एकमत ऑनलाईन

परिस्थितीचा आढावा घेणार : अधिकारी दिवस-रात्र अचानक भेट देऊन गस्त घालणार

औरंगाबाद :  कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलिस, महसुल प्रशासनाने ‘मास्टर प्लॅनिंग’ केली आहे. या काळात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अधिकाऱ्यांची टिम रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दिवस-रात्र हे अधिकारी अचानक भेट देऊन गस्त घालणार आहेत.

संचारबंदीच्या काळात या सेवांना राहणार प्राधान्य

१८ जुलैपर्यंत असणाऱ्या संचारबंदीला सुरूवात झाली आहे. संचारबंदी काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच प्रशासनाने दिलेला आहे.संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांद्वारे पालन होत आहे कि नाही, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाली आहे. शुक्रवारी संचारबंदिच्या पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे. घरपोच दुध वितरण सकाळी ६ ते सकाळी ८. ३० वाजेपर्यंत, सर्व खासगी, सार्वजनिक वैद्यकीय सेवा, आस्थापना, पशुचिकित्सा सेवा यांनाच नियमित वेळेत सुरू ठेवण्यास मुभा आहे.

वेळोवेळी माहिती देण्याचे या टिमच्या सदस्यांना सूचना

यात महानगरपालिकेचे ४४० कर्मचारी, १० प्रभाग अधिकारी तसेच विभागप्रमुख, २० सुपरवायझर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. २०० टिम यासाठी सज्ज करण्यात आली आहे. परिस्थितीबद्दल वेळोवेळी माहिती देण्याचे या टिमच्या सदस्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोबाईलवर रेकॉर्डींग करून टिमचे सदस्य अधिकाऱ्यांना माहितीz पोहचविणार आहे.

कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार करण्यात आला

संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबरच विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय हे आता मैदानात उतरणार आहेत. मनपा आयुक्त पाण्डेय हे सायंकाळी तर विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर हे रात्रीच्या वेळी परिस्थितीवर नजर ठेवणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी उदय चौधरी हे हि अचानक अनेक भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. बंदच्या काळात कोणत्या सेवा सुरू राहतील यासंदर्भात मनपा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार करण्यात आला आहे.

Read More  नांदेड जिल्ह्यात १२ जुलै पासून संपूर्ण लॉकडाउन जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या