32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून कोविड रुग्णाची आत्महत्या

औरंगाबाद घाटी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून कोविड रुग्णाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील सुपेरस्पेसिएलिटी विंगच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन 42 वर्षीय कोविड रुग्णाने आत्महत्या केली. काकासाहेब कणसे असे या रुग्णाचे नाव आहे. या घटनेची माहिती बेगमपूरा पोलिसांत देण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आले नाही. सकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली.

बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, काकासाहेब कणसे (वय -42, रा. धनगाव, तालुका पैठण, जि. औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या रुग्णाचे नाव असून त्याच्यावर 21 सप्टेंबरपासून घाटी रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील समर्पित कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

एकूण पाच मजले असलेल्या या सुपेरस्पेसिएलिटी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून कणसे याने आज सकाळी 7.45 च्या सुमारास इमारतीच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या खोल जागेत उडी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून पोलिस नातेवाईकांकडे चौकशी करीत आहेत.

या घटनेने घाटी रुग्णालयात खळबळ निर्माण झाली. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हारबडे, सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

औरंगाबाद शहरात गरिबांची घाटी म्हणून ओळखल्या जात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घाटी रुग्णालयात शनिवार पर्यंत तब्बल 700 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जिल्ह्यात आजवर झालेल्या मृत्यूचा आकडा 909 वर पोहोचला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांशिवाय महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र इत्यादी ठिकाणाहून घाटी रुग्णालयात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 550 च्या घरात पोहोचली आहे. असे असतानाही मोठ्या विश्वासाने उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, प्रसूती विभाग आणि इतरही महत्त्वाच्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई द्यावी – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या