22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये आठवडाभरात सक्रिय रुग्णसंख्येत घट

औरंगाबादमध्ये आठवडाभरात सक्रिय रुग्णसंख्येत घट

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख वेगाने उतरणीला लागला आहे. संसर्गघटीचा गेल्या आठवड्यातील वेग पाहता शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या आठवडाभरात ऍक्टिव्ह रुग्णसंख्येत २ हजारांनी घट होत ती ४१७१ वरून २२०० पर्यंत आली आहे.

कोरोना संसर्गाचा दुस-या लाटेला शहरात १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मार्च महिन्यात तब्बल ३२ हजार बाधित आढळले. कोविड केअर सेंटरसह सरकारी व खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाले. कुटुंबातील सदस्य मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागल्याने गृह विलगीकरणाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयांचा ताण काहीसा कमी झाला.

एप्रिल महिन्यातही रुग्ण संख्या वाढतच गेली. बाधितांचा आकडा ४१ हजारपर्यंत गेल्याने आरोग्य विभाग हतबल झाला होता. मात्र प्रशासनाने योग्य नियोजन करीत शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू दिला नाही. रोज हजारांनी वाढणा-या रुग्णसंख्येला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ब्रेक लागला. रुग्ण बरे होण्याची संख्या वाढू लागली.

लसीकरणावर भर
१ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तसेच ४५ वर्षावरील व्यक्तींचेही लसीकरण केले जात आहे. लसीकरण मोहिमेकडे महापालिका प्रशासनाने अधिक लक्ष दिले आहे. आठ दिवसात १८ हजार नागरिकाचे लसीकरण झाले.१ मे पासून रुग्ण संख्येत झपाटयाने घट झाली. १ मे रोजी ४ हजार १७१ ऍक्टिव्ह रुग्ण होते. दररोज अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होते. ती संख्या सध्या २२०० वर आली आहे.

दहा कोवीड केअर सेंटर बंद
कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याने महापालिका प्रशासनाने १० कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.एप्रिलच्या तिस-या आठवड्यात कोविड केअर सेंटरची संख्या २१ वर गेली होती. मात्र आता ही संख्या १० वर आली आहे.

लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या