23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादच्या वाट्याला येणार तीन मंत्रिपदे?

औरंगाबादच्या वाट्याला येणार तीन मंत्रिपदे?

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांच्या वाट्यालाही चांगली मंत्रिपदे येणार अशी चर्चा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदेंसोबत पाच शिवसेना आमदार गेले असून त्यांचीही खाते वाटपात लॉटरी लागणार अशी चर्चा आहे.

यापैकी तिघांना मंत्रीपदे मिळणार तर उर्वरीत दोघांना राज्यमंत्री पद मिळणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारामुळे औरंगाबादेत शिवसेने अंतर्गतच दोन गट पडले आहेत. बंडखोरांविरोधात अनेकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला आहे. तर अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या समर्थकांच्या त्यांच्या मतदार संघात समर्थनासाठी रॅलीही काढली होती. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यामुळे नवी शिवसेना विरोधात जुनी शिवसेना असे दोन गट पडण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये हा वाद अधिक उफाळून येईल आणि याचा फायदा भाजपाला होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सहापैकी पाच शिंदेंसोबत
औरंगाबाद जिल्ह्यातील ९ आमदारांपैकी ६ आमदार शिवसेनेचे आहेत. त्यापैकी पाच आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात शामील झाले आहेत. यात पैठणचे आमदार संदीपान भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, वैजापूरचे रमेश बोरनारे, औरंगाबाद पश्चिमचे संजय शिरसाट तर औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा समावेश होते. तर कन्नडचे एकमेव आमदार उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या