27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeऔरंगाबादपाणीप्रश्नी भाजपचा मनपावर हंडामोर्चा

पाणीप्रश्नी भाजपचा मनपावर हंडामोर्चा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद मनपाची आगामी काळात निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजपने आता रणशिंग फुंकण्याचे ठरविले असून, पाणी प्रश्नाच्या मुद्यावरून दि. २३ मे रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद मनपावर हंडामोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद येथील पाणीप्रश्न चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. यातून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या