30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeऔरंगाबादनगर-औरंगाबाद रोडवर बर्निंग अ‍ॅम्ब्युलन्स

नगर-औरंगाबाद रोडवर बर्निंग अ‍ॅम्ब्युलन्स

एकमत ऑनलाईन

वाळूज : गंगापूर तालुक्यातील वाळूज येथील गरवारे कंपनी जवळ शासकीय १०८ या चालत्या रुग्णवाहिकेला आग लागली. ही घटना दुपारी ४.३० च्या दरम्यान घडली. या रुग्णवाहिकेला आग लागल्यानंतर या गाडीत रूग्णांसाठीच्या ऑक्सीजन सिलेंडरमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे गाडीचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने या घटनेत गाडीचा चालक व डॉक्टर दोघेही बालंबाल बचावले. तसेच ही गाडी विझविण्यासाठी गाडीजवळ असलेल्या अग्निशमनच्या जवानांचे प्राण वाचले.

भेंडाळा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका क्रमांक एम एच १४ सी एल ०७९३ ला गुरुवारी (८ एप्रिल) दुपारी साडेचारच्या सुमारास इमर्जन्सी कॉल आला. त्यामुळे ही रुग्णवाहिका जाण्यासाठी निघाली होती. जवळच बजाज गेट समोरील एचपी पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी ती जात असताना वाळूजच्या पुढे महामार्गावर असलेल्या हॉटेल ओम साईजवळ गाडीतून धूर निघू लागला. गाडीचा पायलट सचिन गोरखनाथ कराळे (रा. कराळे गल्ली गंगापूर, जि. औरंगाबाद) याला त्याचा अंदाज आला. त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या कडेला घेतली व सोबत असलेले डॉक्टर प्रशांत पंडुरे असे दोघेही गाडीतून बाहेर पळाले बघता बघता गाडीच्या आगीचे रौद्ररूप धारण केले.

गॅस सिलिंडरचा झाला मोठा स्फोट
जवळपास ही रुग्णवाहिका २० मिनिटे जळत होती. याची माहिती काही दक्ष नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी याची माहिती गरवारे व बजाज कंपनीच्या अग्निशमन विभागाला दिली. त्यावेळी अग्निशमन विभागाची गाडी आग विझवण्यासाठी आली. अग्निशमन दलाची गाडी पेटत्या रुग्णवाहिकेजवळ येताच गाडीतील ऑक्सिजनच्या गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यावेळी गाडीच्या पूर्णपणे चिंधड्या उडाल्या. रस्त्याने जाणा-या एका ऑटो रिक्षावर गाडीचा काही भाग पडल्याने त्याचे वरचे छत जळाले. तसेच यावेळी गाडीजवळ आलेले बजाज कंपनीच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारीही भयभीत झाले. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.

मंदिर-मशिद वादात सर्वेक्षणास परवानगी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या