25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeऔरंगाबादचंद्रकांत पाटीलांनी मनातली भावना बोलून दाखवली : सिरसाट

चंद्रकांत पाटीलांनी मनातली भावना बोलून दाखवली : सिरसाट

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : चंद्रकांत पाटील हे त्यांच्या मनातील भावना बोलले असतील. भाजप कार्यकर्त्यांना असं वाटतही असेल तर त्यात गैर नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटातून आमदार संजय सिरसाट यांनी दिली आहे.

दरम्यान मनावर दगड ठेवून भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, पुण्यातील पदाधिका-यांच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच वादात सापडलं आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, हे अजूनही अंगवळणी पडत नसल्याचे वक्तव्य अनिल बोंडे यांनीही केलं आहे. यावर एकनाथ शिंदे गटातून आता प्रतिक्रिया आली आहे.

औरंगाबादमधून शिंदे यांच्या गटात गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिला आहे. चंद्रकांत पाटील हे त्यांच्या मनातील भावना बोलले असतील. भाजप कार्यकर्त्यांना असं वाटतही असेल.. पण अखेरचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात गैर नाही. पक्ष श्रेष्ठींनी निर्णय गेतल्यानंतर त्यात काहीही अडचण येणार नाही. मतभेदही होणार नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहें.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या