30.8 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home औरंगाबाद जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग; 27 दरवाजे उघडले

जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेक एवढा विसर्ग; 27 दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रात्री अक्षरशः ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. या पावसामुळे ग्रामीण भागात दाणादाण उडाली आहे. जिल्ह्यातील अनेक लहान नद्यांना, ओढ्यांना पूर आला तर पिके आडवी झाली आहेत. या वर्षातला सर्वाधिक मुसळधार पाऊस रात्री झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले. कन्नड तालुक्यातील करंजखेड, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी पाणी शेतात साचले तर गावात देखील पाणी शिरले.

औरंगाबाद पैठण जायकवाडी धरणातून 10 ते 27 दरवाज्यातून 75 हजार 456 क्युसेक आणि 1 ते 9 दरवाजे हे आपत्कालीन असून ते दोन फूट उंचीपर्यंत उचलण्यात आलेले आहेत. त्यामधून 18 हजार 864 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. असा एकूण 94 हजार 320 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहेजायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांपैकी काही दरवाजे दीड फूट काही दोन फूट तर काही दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी पात्रानजीक राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याबरोबरच नदीपात्रामध्ये मालमत्ता, चीज वस्तु, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती अवजारे इतर साधने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यामुळे व कुंडलिका, बिंदुसरा प्रकल्पातून होत असलेल्या विसर्गामुळे माजलगाव धरण 100 टक्के भरले असून प्रकल्पात पाण्याचा वाढता ओघ पहाता माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणाच्या पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र आता अकरा दरवाजे उघडण्यात आलेत.
जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात 94 हजार 320 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सिंधफना नदी पात्रालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. याबाबत सर्व नदी लगतच्या गावांमध्ये संबधीत ग्रामयंत्रणेमार्फत अवगत करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अकलुज प्रांतधिकारी कार्यालय येथे माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ व अकलुज शहर पत्रकार संघ यांच्या वतीने विविध मागण्यासाठी निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या