24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeऔरंगाबादविलासराव देशमुख यांच्या पुतळयासाठी समिती

विलासराव देशमुख यांच्या पुतळयासाठी समिती

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : मराठवाड्याचे भुमिपुत्र, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा औरंगाबाद शहरात पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिका-यांच्या बैठकीत घेण्यात आला. पुतळा उभारणीसंदर्भात समिती गठीत केली असून तिच्या अध्यक्षपदी माजी मंत्री अनिल पाटील यांची निवड करण्यात आली.

पुतळा समितीत उपाध्यक्षपदी माजी आमदार केशव औताडे, सरचिटणीसपदी प्रकाश मुगदिया, कोषाध्यक्षपदी मोहम्मद उस्मानी यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी माजी खासदार उत्तमसिंग पवार, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, सुभाष झांबड, मकरंद कुलकर्णी, चंद्रभान पारखे, आर. आर. खडके, उदय बोपशेट्टी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

निवडीच्या कार्यक्रमात सर्वांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विलासरावांनी मराठवाड्याच्या विकासाला चालना देतानाच औरंगाबादवर विशेष प्रेम केले, असे गौरवोद्गार अनेकांनी यावेळी काढले.पुतळा उभारणीसाठी जागेची पाहणी करणे, जागेसाठी पाठपुराव्यासह पुढील सर्व कार्यवाही करण्याचे कामही समितीकडून करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.

बाळ बोठेने कोठडीतून केले वकिलांना फोन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या