30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन

औरंगाबाद शहरात पंधरा ठिकाणी कन्टेनमेंट झोन

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने कन्टेनमेंट झोन निश्चित करून प्रभावी उपाययोजना राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीच्या टीमकडून कन्टेनमेंट झोन निश्चित केले आहेत. टीमने शहरातील १५ वसाहतीत कन्टेमनेंट झोन म्हणून निश्चित केल्या आहेत. कन्टेनमेंट झोनमधील अधिकाधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यासह प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहे.

तसेच लसीकरणाची जम्बो मोहीम राबवली जाणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात येत आहे. पालिकेच्या ३७ आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत आशा वकर्सकडून ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे सर्वेक्षण करून तीन प्रकारांत कन्टेनमेंट झोन निश्चित केले आहेत. त्यानुसार मायक्रो कन्टेनमेंट एरियात २० आणि त्याहून अधिक सक्रिय रूग्ण असलेल्या वसाहती, मध्यम कन्टेनमेंट एरियात ७० आणि त्यापेक्षा जास्त सक्रिय रूग्ण असलेल्या वसाहती, तर ज्या भागात मध्यम कन्टेनमेंट झोनअंतर्गत १ हून अधिक कॉलनी आहेत, असे पालिकेच्या अधिकाºयांनी सांगितले.

 

शहर-जिल्ह्यात ६७७ नव्या रुग्णांची भर, १२ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या