22 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही

औरंगाबादमध्येही कोरोना मृत्यूसंख्येत लपवाछपवी; ५७० अधिक बळीची पोर्टलवर नोंदच नाही

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या आकडेवारीतील गफलत हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. केंद्र सरकारवर अनेकजणांनी कोरोना मृत्यूसंख्या लपविल्याबद्दल टीका केली आहे. मराठवाड्यातही काही दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यांतील कोरोना मृत्यूंच्या संख्येत विसंगतीचा मुद्दा गाजला होता. आता पुन्हा औरंगाबादमध्येही असाच प्रकार घडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही तब्बल ५७० मृत्यू केंद्र सरकारच्या कोरोना संदर्भातील पोर्टलवर कमी नोंदवल्याची माहिती उघड झाली आहे.

कोरोनासंदर्भातील पोर्टलवर औरंगाबादेत २ हजार ३५२ मृत्यूची नोंद आहे. प्रत्यक्षात रविवारपर्यंत औरंगाबादेत २ हजार ९२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेतील मृत्यूची गंभीर स्थिती केंद्रापासून लपून रहात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी ज्या रुग्णांच्या मृत्यूची कोरोना म्हणून नोंद झालेली नाही, त्यांना विमा योजना व अन्य सुविधांपासून वंचित रहावे लागणार असल्याची शक्यता व्यक्त होण्याची शक्यता आहे.

अर्थव्यवस्था आणि संसर्ग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या