30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद शहराच्या प्रवेशस्थळांवरच कोरोना चाचणी; ६३ बाधित सापडले

औरंगाबाद शहराच्या प्रवेशस्थळांवरच कोरोना चाचणी; ६३ बाधित सापडले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगावाहून येणा-या लोकांमुळेही रुग्णसंख्येत भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात प्रवेश करणा-या नागरिकांची शहराच्या प्रवेश ठिकाणांवरच तपासणी सुरु केली आहे. कोरोना चाचणी झाल्यावरच शहरात प्रवेश दिला जात आहे. शुक्रवारी शहराच्या ६ एन्ट्री पॉइंटवर बाहेरगावाहून येणा-या ६३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून सध्या शहराच्या ६ एन्ट्री पॉइंटवर बाहेर गावाहून येणा-यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. चिकलठाणा येथील एन्ट्री पॉइंटवर २०४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आले. हर्सुल टी पॉइंटवर १२६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २० जण पॉझिटिव्ह आढळले. कांचनवाडी येथे १३७ जणांची कोरोना चाचणीपैकी ११ जण पॉझिटिव्ह आले. झाल्टा फाटा येथे १४० चाचणीपैकी सात जण, नगरनाका येथे ५३७ चाचणीपैकी पाच जण, दौलताबाद टी पॉइंट येथे २६५ चाचणीपैकी पाच जण पॉझिटिव्ह आढळले.

 

विदर्भात सूर्याचे आग ओकणे सुरूच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या