23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home औरंगाबाद दरवाढीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

दरवाढीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक

औरंगाबाद : महाराष्ट्रातील दूध उत्पादक तसेच विक्रेते दुधाच्या दरवाढीसाठी तसेच इतर मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. राज्यात १ ऑगस्टला ठिकठिकाणी दूध उत्पादक आंदोलने करीत आहेत. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार या आंदोलनाचा शेतकरी संघर्ष समितीने आधीच इशारा दिला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी आंदोलकांनी दुधाचे टँकर अडवले व स्थानिक देवतांना दुधाचा अभिषेक केला. राज्यातील अमरावती, सांगली, जालना, औरंगाबाद, पुणे, अकोला, पंढरपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन चालू आहे.

या आंदोलनात आंदोलकांनी अनेक मागण्या केल्या. यात दुधाला ३० रुपये प्रति लिटर भाव मिळावा व त्यासाठी राज्य सरकारकडून प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी केली आहे. याशिवाय जेनेरिक मेडिसीनच्या बदल्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीला दिलेली परवानगी रद्द करावी व देशभरातील गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रति किलो इतके अनुदान द्यावे अशाही मागण्या करण्यात आल्या. किसान सभा, दूध उत्पादक समिती तसेच इतर समविचारी संघटनांकडून २० जुलैपासून हे आंदोलन राज्यभरात सुरू आहे.

Read More  अमेरिका देणार चीनला धक्का , लवकरच टिकटॉक वर बंदी घालणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow