25.5 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeऔरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कोरोना वाढत्या पार्श्वभूमिवर बुधवार दि़ १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० पदवीच्या आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ३ मे २०२१ नंतर घेण्यात येतील आणि त्यावेळेस त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती विद्यापीठाने तातडीचे पत्रक काढून दिले आहे.

सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रतिदिन जवळपास साठ हजार रुग्ण आढळत आहेत. यामुळे महाराष्ट्रात १४ तारखेपासून १ मेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर झालेले आहे. त्याअगोदर दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलल्याची घोषणा झाली होती.

तसेच ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२० पदव्युत्तर आणि इतर अभ्यासक्रमाच्याही परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्या परीक्षा ५ मे २०२१ नंतर होतील. तसेच मे महिन्यातील परीक्षा जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. या पत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या द्वितीय सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु राहणार आहेत.

राजकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी डॉक्टरांचे मोदींना साकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या