24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home औरंगाबाद डॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे

डॉ. रंजन गर्गे : कोरोना चार प्रकारे पसरत आहे

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोरोना चार प्रकारे पसरत असून, यात एका व्यक्ती कडून दुस-या व्यक्तीकडे कोरोना पसरू शकतो. अनेक विषाणू एका ड्रोपलेटच्या माध्यमातून ६ फूट अंतरापर्यंत प्रवास करू शकतात; असाही कोरोना पसरू शकतो. श्वासोस्च्छवास, शिंक यात स्वतंत्र विषाणू हवेत तरंगत ३० फूट अंतरापर्यंत प्रवास करतात; असाही कोरोना पसरू शकतो. दरवाजे, कडी कोंडे, टेबल, भांडी, नोटांचा कागद, किराणा पार्सल्स याद्वारेही कोरोना पसरण्याची भीती असते. मात्र हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही. रुग्णालयात ए.सी न वापरता खिडक्या उघड्या ठेऊन हवा खेळती ठेवली जाते. अशा हवेतून कोरोनाचा रोगप्रसार होत नाही. ए.सीमध्ये हवा खेळती नसल्यामुळे रोग प्रसार होण्याची शक्यता वाढते, असे औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठी विज्ञान परिषदेने कोरोनावर वेबिनारचे आयोजन केले होते. या वेबिनारमध्ये औरंगाबाद येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रंजन गर्गे बोलत होते. ते म्हणाले, भाज्या, पैसे, किराणा यातून संसर्ग होऊ शकतो. हे पदार्थ हाताळताना जर तो व्यापारी कोरोना ग्रस्त असेल किंवा कोरोनाचा वाहक असेल तर संसर्ग होऊ शकतो. पैसे आणि किराणा मालाचे पार्सल, त्याची पाकिटे या वरती सॅनिटायझर शिंपडून घ्यावे आणि पाच तासानंतर वापरावे. कारण या विषाणूचा संसर्ग संपर्क काळ पाच तासाचा असतो असे तज्ज्ञांचे मत आहे. भाजी मात्र गरम मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यात सोडा टाकावा, असे काहींचे म्हणणे आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

Read More  रिया चक्रवर्ती तुझे वास्तव लवकरच समोर येईल; मृत्यूच कोडं गुंतागुंतीच होत आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या