औरंगाबाद: औरंगाबादचे महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यावरही त्यांना कोरोनाची लह्यागण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काहीसा त्रास होत असल्याने पांडेय यांनी शनिवारी कोरोनाची चाचणी केली होती. रविवारी सकाळी आलेल्या अहवालामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाल्यानंतर पांडेय युद्धपातळीवर कामाला लागले होते. मनपा बरखास्त झाल्याने शहराच्या सर्वच कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र तरीही त्यांनी चांगला कारभार केला आहे. कोरोनाचे संकट सुरु झाल्यानंतरही त्यांनी धडाडीने कामाला सुरुवात केली होती. औरंगाबादमध्ये यापुर्वीच वैद्यकीय अधिका-यांसह काही प्रमुख अधिका-यांना कोरोनाची लागण झाली आहे.
बेड देता का हो बेड.. रुग्णाचा टोहो!