26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeऔरंगाबादबनावट नोटा चलनात, ६ जणांची टोळी जेरबंद

बनावट नोटा चलनात, ६ जणांची टोळी जेरबंद

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटा छापून चलनात आणणा-या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६ आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर पुन्हा एकदा बनावट नोटांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, तो चिंतेचा विषय बनला आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद शहरात बनावट नोटा छापून चलनात आणणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. या प्रकरणी आरोपींकडून २५ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटांसह १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने शहरातील शिवाजीनगर परिसरात सापळा रचून ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचा एक साथीदार फरार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक इसम मोपेड प्लेझर क्रमांकएम एच २०-एफवाय-९५७९ ने शिवाजीनगर परिसरातील पाण्याच्या टाकीसमोर बनावट चलनी नोटा ख-या म्हणून वापरण्याकरिता घेवून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळ््याचे नियोजन करून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचून सापळा लावून ६ जणांना ताब्यात घेतले.

ससाणे नावाच्या
व्यक्तिमार्फत रॅकेट
आंबादास ससाणे नावाच्या व्यक्तीच्या मार्फत बनावट चलनी नोटा चलनात आणण्याचे रॅकेट चालत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.

हे आहेत आरोपी…
बनावट नोटा रॅकेट प्रकरणी हनुमंत अर्जुन नवपुते (२१ वर्ष रा. धारदोनगाव ता. जि. औरंगाबाद), किरण रमेश कोळगे (२३, रा. गाडीवाट ता. जि. औरंगाबाद), चरण गोकुळसिंग शिहरे (४०, रा. घारदोन ता. जि. औरंगाबाद), प्रेम गोकुळ शिहरे (२६, रा. सदर), संतोष विश्वनाथ शिरसाठ (४७, रा. राजीवनगर, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद), हारुणखान पठाण (रा. बायजीपुरा, औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले आहे.

कारवाईतील मुद्देमाल
-१०० रुपये दराच्या २५७ बनावट चलनी नोटा
-एकूण पाच मोबाईल हॅन्डसेट
-गुन्ह्यात वापरलेली मोपेड
-नोटा विक्रीमधून आलेले २१ हजार ५०० रुपये
-छपाईसाठी लागणारे शाईच्या बॉटल
-नोटा कटिंग करण्याचे मशिन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या