22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या अखेर मध्य प्रदेशमध्ये सापडली

औरंगाबादमधील प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या अखेर मध्य प्रदेशमध्ये सापडली

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादमधील प्रसिद्ध अल्पवयीन यूट्यूबर बिंदास काव्याचा अखेर शोध लागला आहे. शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेली काव्या अखेर मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली आहे. काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईने औरंगाबादमधील छावणी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. अखेर आज मनमाडहून इटारसीला जात असताना ती रेल्वे पोलिसांना सापडली आहे. तिच्यासोबत कोण होतं याची माहिती अद्याप समोर आली नसून ती भोपाळच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. या अल्पवयीन यूट्यूबर मुलीचे यूट्यूबवर ४.३२ मिलियन सबस्क्रायबर आहेत.

बिंदास काव्याच्या आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा एक व्हीडीओ पोस्ट केला होता. काव्याच्या अचानक गायब होण्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. मात्र ती सापडल्याने आता तिच्या कुटुंबियांसह चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. बिंदास काव्याला सोशल मीडियावरील एक इनफ्लूयन्सर म्हणून ओळखले जाते.

काव्या ९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता रागाच्या भरात घराबाहेर निघून गेली, यानंतर ती परतलीच नाही. ती परत न आल्याने कुटुंबिय घाबरून गेले होते. दरम्यान तिचा मोबाईलही बंद येत होता. ज्यामुळे कुटुंबिय अधिकच चिंतेत होते. यानंतर तिच्या कुटुंबियांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेत काव्या अल्पवयीन असल्याचे म्हणत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. अखेर आज ती सापडली आहे.

औरंगाबादच्या पडेगावात आई-वडिलांसह राहणारी काव्या मागील वर्षभरात यूट्यूबवर प्रसिद्धीच्या झोतात आली. यूट्यूबवर तिच्या व्हीडीओंना जवळपास ५ ते ४५ मिलियन व् ूूज मिळतात. साडेचार मिलियन सबस्क्राईब असलेली काव्या वडिलांसोबतच्या व्हीडीओमुळे चर्चेत आली. यूट्यूब व्यतिरिक्त ती इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रसिद्ध आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या