22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऔरंगाबादवीज पडून शेतक-याचा मृत्यू

वीज पडून शेतक-याचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सिल्लोड,: शेतात ठिंबकच्या नळ्या अंथरत असताना विज पडून एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी तालुक्यातील सावखेडाजवळील उटाडेवाडी शिवारात घडली.

संजय नथ्थू उटाडे (४०) असे विज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शनिवारी शेतात कपाशीच्या लागवडीसाठी मयत संजय उटाडे ठिंबकच्या नळ्या अंथरत होते. या दरम्यान अचानक विज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत मृतदेह सिल्लोड उपजिल्हा रुग्णलयात आणला.

तालुक्यात शुक्रवारपासून ढगाळ वातावरण आहे. शनिवारी दुपारी तालुक्यातील काही भागात मेघगर्जेसह रिमझिम पाऊस झाला. सध्या ग्रामीण भागात शेतीच्या कामांनी वेग घेतला असून विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने सावखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या