औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत.आतापर्यंत २ हजारच्या वर रूग्ण पॉझिटिव्ह आढळेल असून,जिल्ह्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. औरंगाबाद मध्ये रुग्णांची संख्या वाढत असतानाच त्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील गणेश नगर भागातील ३८ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण पळाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. पळालेल्या या रुग्णावर घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
कोरोना बाधित रूग्ण दवाखान्यातून पसार : औरंगाबादेतील घाटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असताना देखील,त्यांना चकवा देऊन कोरोना बाधित रूग्ण दवाखान्यातून पसार झाला आहे. अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेला कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून, रुग्णाविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे देखील घाटी रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले आहे.
Read More मजुरांवरील खटले मागे घ्या, सुप्रीम कोर्टाने दिले केंद्र सरकारला आदेश
हर्सूलच्या कारागृहात रविवारीही पळाले होते दोन कैदी : बनावट नोटा प्रकरणी हर्सूलच्या कारागृहात १ नोव्हेंबर २०१९ पासून असलेला सय्यद सैफ आणि हत्येचा आरोपी असलेला आक्रमखान या दोघांसह कारागृहातील २९ जणांना कोरोना झाला आहे. कोरोनाबाधीत सर्व कैद्यांवर उपचार सुरू आहेत. सर्व कैद्यांवर कीलेअर्क येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये शनिवारपासून उपचार सुरु होते.या सर्वांना दुसऱ्या मजल्यावरील १५ खोल्यांमध्ये, प्रत्येक खोलीत २ कैदी अशा पद्धतीने ठेवण्यात आले होते.या सर्व कैद्यांवर पाळत ठेवण्यासाठी दोन तुरुंग अधिकारी तसेच १२ कारागृह पोलीसचे जवान तैनात होते.मात्र रात्रीच्या पाऊणे अकराच्या दरम्यान सय्यद सैफ आणि आक्रमखान या कैद्यांनी खिडकीचे गज वाकवले. वाकवलेल्या गजांना चादर बांधून कैदी पसार झाले. यावेळी तुरुंग अधिकारी के. ए काळे यांची कर्तव्यावर होते. पळून गेलेले दोन्ही आरोपी गंभीर गुन्ह्यांमध्ये पकडले होते. त्यामुळे तातडीने पोलीस तपास सुरू झाला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.