23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeऔरंगाबादमजुरीला जाणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मजुरीला जाणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

एकमत ऑनलाईन

कन्नड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार
औरंगाबाद : एकिकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्राला हदरावणारी घटना समोर आली आहे. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने शेतात मजुरीला जाणा-या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवत गावातीलच ६ नराधमानी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित अल्पवयीन मुलीच्या घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने ती गावातीलच शेतात मजुरी करते. सोमवारी दुपारी ती शेतात जात असताना सहा आरोपींनी तिला रस्त्यात अडवले आणि निर्जनस्थळी नेत आळीपाळीने पीडितेवर अत्याचार केला. यानंतर आरोपी पीडितेला सोडून तिथून पसार झाले. भेदरलेल्या पीडितेला वेदना अस होत असल्याने तिने घर गाठत घडलेला प्रसंग आईला सांगितला. आईने क्षणाचाही विलंब न करता पीडितेला सोबत घेत कन्नड ग्रामीण पोलिस ठाणे गाठत फिर्याद नोंदविली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी सर्व ६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. यातील काही आरोपींनी यापूर्वीदेखील पीडितेची छेड काढत अत्याचार केले होते. मात्र, पीडितेने भीतीने ही बाब कुणालाही संगितली नव्हती. मात्र, ६ नराधमाच्या अत्याचारानंतर अस वेदनेमुळे तिने हिंमत करत आईल घडलेला प्रकार सांगितला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास औरंगाबाद ग्रामीण पोलिस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या