28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeऔरंगाबादफुलंब्री तालुक्यातील कापसाच्या शेतातून गांजा जप्त

फुलंब्री तालुक्यातील कापसाच्या शेतातून गांजा जप्त

एकमत ऑनलाईन

६३० किलो गांजा, किंमत ६६ लाख, तिघे अटकेत
औरंगाबाद : नागपूर सीमेवर एका ट्रकमधून सुमारे १५०० किलो गांजा जप्त करण्याच्या कारवाईला काही तास उलटत नाही, तोच औरंगाबादमध्येदेखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांजाची मोठी कारवाई केली. एका कापसाच्या शेतातून तब्बल ६६ लाखांचा ६३० किलो गांजा पकडला. या प्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले. रामभाऊ अमृता तांदळे (रा. गणोरी ता. फुलंब्री), सुखलाल फंदुसिंग जंगाळे (रा. निधोना ता. फुलंब्री), कारभारी शामलाल गुसिंगे (रा. निधोना ता. फुलंब्री) असे आरोपींची नावे आहेत.

फुलंब्री तालुक्यातील गणोरी आणि निधोना गावात काही शेतक-यांनी आपल्या शेतात गांजा लावला असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी छापा मारला. त्यावेळी रामभाऊ तांदळे यांच्या गणोरी शिवारातील गट क्र. २४ मधील ऊस व कपासीच्या पिकात गाजांचे ८ ते १० फूट उंचीचे एकूण ४५ झाडे ज्याचे एकूण वजन ५२० कि. ग्रॅ. होते, तर सुखलाल फंदुसिंग जगांळे यांच्या मालकीच्या निधोना शिवारातील गट नं. १२५ मधील कापसाच्या पिकात गांजाचे ७ ते ८ फूट उंचीचे एकूण ४० झाडे ज्याचे एकूण वजन ५३ कि.ग्रॅ. आढळून आले. सोबतच शेतात सुखलेला १० किलो गांजादेखील मिळून आलेला आहे.

तसेच कारभारी शामलाल गुसिंगे यांच्या निधोना शिवारातील गट नं. ११९ मध्ये छापा मारला असता कापसाच्या पिकात गांजाचे पाच ते सहा फूट उंचीचे एकूण २२ झाडे ज्याचे एकूण वजन ७५ कि. ग्रॅ. मिळून आलेले आहे. त्यामुळे तिन्ही शेतक-यांच्या शेतात एकूण १०७ गांजाचे झाडे ज्यांचे वजन ६४८ किलो व सुखलेला १० किलो गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत ६६ लाख ५ हजार एवढी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या