24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeऔरंगाबादशस्त्रक्रिया करताना डॉक्टरला हृदयविकाराचा झटका

शस्त्रक्रिया करताना डॉक्टरला हृदयविकाराचा झटका

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एक डॉक्टर शस्त्रक्रिया करत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर औरंगाबादमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात असून या डॉक्टरांचे नाव दिग्विजय शिंदे असे आहे. या घटनेने संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. दिग्विजय शिंदे हे फिजिशियन इंटेंसिविस्ट होते. ते मूळचे इटखेडा येथील आहेत. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दिग्विजय प्रॅक्टिस करत होते. यादरम्यान ते दूर्बिणद्वारे शस्त्रक्रिया करत होते. मात्र शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार केले आणि त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तात्काळ हृदयविकारतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ परंतु सर्व प्रयत्न विफल ठरले आणि डॉ. दिग्विजय शिंदे यांचा मृत्यू झाला.

जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न फसला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या