28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeऔरंगाबादमृत्यूदर १० वरून ४ वर आणण्याचे औरंगाबाद टीमचे महत्त्वपूर्ण कार्य

मृत्यूदर १० वरून ४ वर आणण्याचे औरंगाबाद टीमचे महत्त्वपूर्ण कार्य

एकमत ऑनलाईन

कोविड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सर्वतोपरी सज्ज : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख

औरंगाबाद : प्रतिनिधी
कोविड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात वेळेत सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासन सर्वतोपरी सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज येथे केले.
औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ना. अमित विलासराव देशमुख बोलत होते.

जिल्ह्यातील कोविड-१९ च्या संसर्गाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर ना. अमित देशमुख यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. कोविड -१९ चा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवत असताना औरंगाबादच्या टीमने कोविड-१९ लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर १० वरून ४ पर्यंत खाली आणण्याचे उल्लेखनीय कार्य केले असल्यचे सांगून या टीमचे त्यांनी जाहीर कौतुक केले. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण स्तरापर्यंत योग्य पद्धतीने कोविडबाबत जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा, स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात अनेक आघाड्यांवर कोविड संसर्ग रोखण्यासाठी समाधानकारक काम सुरू आहे. शहरी भागात महानगरपालिकेमार्फत आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य पद्धतीने काम सुरू आहे तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात औद्योगिक वसाहतीत २०० खाटांचे विशेष रुग्णालय तयार होत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी एक अधिकचे रुग्णालय यामुळे उपलब्ध होत असल्याचे ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले.

Read More  लातूर जिल्ह्यात २ कोरोना रुग्ण वाढले

लवकरच चाचणी केंद्राची संख्या शंभरवर पोहोचेल
सर्व स्तरावर शासन कोविड- १९ चा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवत आहे. आज देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत. कमी कालावधीत आपण राज्यात ८५ चाचणी केंद्रे सुरू केली असून लवकरच चाचणी केंद्राची संख्या शंभरवर पोहोचेल, असे सांगून ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या आरोग्य आपत्तीत सर्वात महत्त्वाचे आहे ते वेळेत योग्य उपचार मिळणे. त्या दृष्टीने सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य शासनाने भर दिला असून शासकीय रुग्णालयांसोबत खाजगी रुग्णालय, आरोग्य संस्था, तज्ज्ञ यांच्या सोबत सामंजस्य करार करून त्यांचे सहकार्यदेखील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका वेळीच रोखण्यासाठी घेण्यात येत आहे.

उपचारांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व उपचार, चाचण्या या शासकीय रुग्णालयात मोफत करण्याचे राज्य शासनाने सुरुवातीलाच ठरवले त्यानुसार सर्वत्र या उपचारांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही तसेच इतर खाजगी रुग्णालयांतही कोरोना रुग्णांस उपचार देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने दर निश्चित करून दिले आहेत तर आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यात आता सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

जीवित, आर्थिक सुरक्षेला प्रथम प्राधान्य
आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस, आशा सेविका व इतर सर्व संबंधित यांच्या जीवित, आर्थिक सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. आपत्तीच्या काळात जनसामान्यांच्या पाठिशी उभे राहण्याचं उत्तम उदाहरण या संकटात शासनाने लोकांसमोर ठेवले आहे. जनतेने आपल्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स्ािंग या नियमांचे पालन करून शासन-प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा संसर्ग होण्याचा धोका जास्त
मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग या आजारांची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांत तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, अशा सर्वांनी आरोग्याला जपत नियमांचे पालन करावे. खाजगी डॉक्टर्सनी या लढ्यात सहभागी होत रुग्ण सेवा सुरू करावी. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपल्याला ही कोविड-१९ ची लढाई जिंकायची आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ना. अमित देशमुख यांनी या वेळी केले. ना. अमित देशमुख यांनी औरंगाबाद येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच कॅन्सर हॉस्पिटललाही भेट दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या