26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबादेत दोनशेहून अधिक बालके कोरोनाग्रस्त

औरंगाबादेत दोनशेहून अधिक बालके कोरोनाग्रस्त

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे मानले जात आहे. मात्र औरंगाबाद शहरात दुस-या लाटेतच कोरोनाबाधित बालकांची संख्या वाढू लागली आहे. औरंगाबाद शहरात गेल्या १० दिवसांत २२० बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात सहा ते अठरा वयोगटातील १७१ बालकांचा समावेश आहे.

शासकीय यंत्रणांनी तिस-या लाटेतील बालकांच्या कोरोना संसर्गाविरोधात तयारी सुरू केली आहे. मात्र औरंगाबादमध्ये दुस-या लाटेतच बालकांना कोरोनासंसर्गाचे वाढीव प्रमाण पाहता शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांना उपाययोजनांचा वेग वाढवावा लागणार आहे. शहरात १० ते १९ मे या दहा दिवसांच्या काळात शून्य ते अठरा या वयोगटातील २२० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात शून्य ते पाच वयोगटातील बालकांची संख्या ४८ असून, सहा ते अठरा वयोगटातील बालकांची संख्या १७१ आहे.

तिस-या लाटेस रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये महापालिकेने पुढाकार घेतला आहे. एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स आणि गरवारे कंपनी या दोन ठिकाणी प्रत्येकी शंभर खाटांचे खास बालकांसाठी कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यास सुरुवात केली आहे.जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत ही दोन्हीही हॉस्पिटल तयार होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सिडको एन-८ येथील महापालिकेच्या दवाखान्यात कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी पन्नास खाटांचे स्वतंत्र रुग्णालय देखील सुरू केले जाणार आहे. पालिकेने तिस-या लाटेच्या अनुषंगाने बालरोगतज्ज्ञांचीही बैठक घेतली आहे.

शहरात उद्यापासून कडक लॉकडाऊन
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीचे आता शेवटचे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. या दहा दिवसांत शहरात कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासकीय यंत्रणांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (२२ मे) केली जाणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे लॉकडाऊन पाळण्यात आला होता, त्याच प्रमाणे या दहा दिवसांत लॉकडाऊन पाळला जाणार असून तो मोडणा-यांना दंड केला जाणार आहे.

कडक निर्बंधांचा निर्णय नागरिकांनी गांभीर्याने घेतल्याचे चित्र नाही. दुकाने बंद असली तरी, रस्त्यावरील वर्दळ मात्र सुरूच आहे. वाहतूक सिग्नलवरदेखील वाहनांच्या रांगा पाहण्यास मिळत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शनिवारपासून ३१ मेपर्यंत शहरात कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी याबद्दल माहिती दिली.

लॉकडाऊन वाढवण्याबाबत परिस्थिती पाहूनच निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या